वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या पाठपुरवठ्याला यश

वैजापूर,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या निविदेला दिलेली स्थगिती अखेर राज्य सरकारने उठवली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑनलाइन निविदा ही प्रसिध्द केली आहे.

वैजापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या निविदेला दिलेली स्थगिती उठविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी प्रशांत द.नवघरे (सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई) यांची भेट घेऊन काही दिवसापूर्वी केली होती त्यास यश आले असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.                    

दुष्काळग्रस्त वैजापूर तालुक्याच्या वैभवात भर पडणाऱ्या वैजापूर तहसील कार्यालयांच्या नवीन इमारतीस शासन निर्णय क्र. बी एल डी – 2021/ प्रक्र  244 / ई- 8  मंत्रालय मुंबई दि. 15/12/2021 प्रमाणे 893.44 लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सदरील निविदेला टेंडर डी. टी. पी. ला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांनी मान्यताही दिली होती व निविदा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया चालू असतांना शासनाचे मुख्य सचिव यांचे दि. 18 -07-2022 च्या पत्रानुसार शासनाने दि. 20-07-2022 रोजी पत्र काढले की   सार्वजनिक बांधकाम विभागच्या अखत्यारीत राज्यस्तरीय योजने अंतर्गत दि. 01 एप्रिल 2021 पासून मंजूर करण्यात आलेल्या परंतु निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण  झाली नाही अशा कामांच्या अंबलबजावणीस स्थगिती देणे बाबत पत्र काढले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांवर अन्याय झाला असून सदरील इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन इमारत धोकादाय आहे म्हणून जाहीर करण्यात आले असून अजूनही तहसिल कार्यालयातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन कार्यरत आहे. सदरील कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवाला धोका असून अनुचित काही प्रकार झाल्यास शासन यास जबाबदार राहील.   वैजापूर तालुक्यात न्याय देण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या सकारात्मक दृष्टीमुळे वैजापूर तहसील कार्यालया च्या इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तसेच याप्रकरणी सचिव श्री. नवघरे यांनी आश्वासन दिले होते की लवकर निविदा प्रसिद्ध करण्यात येतील त्या प्रमाणे  सबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया चालू केली असून निविदा ऑनलाईन प्रसिद्ध केली असून आपल्या मागणीला यश आले असे श्री शेळके यांनी सांगितले.