भायगाव वैजापूर ते खंडाळा 33 केव्ही लाईनचे आ.बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

शेतकऱ्यांची 2012 पासूनची मागणी पूर्ण 

वैजापूर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे भायगाव वैजापूर ते खंडाळा या 8 किमी 33 केव्ही लाईनचे लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी (ता.8)  करण्यात आले. खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांची दहा वर्षांपासूनची ही मागणी होती. 

वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिवूर, भादली, लोणी खुर्द या चारही सब स्टेशनला 33 केव्ही विद्युत पुरवठा एकाच ठिकाणाहून एकाच विद्युत वाहिनीने केला जात असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत होता. त्यासाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या पाठपुराव्याने 8 कि.मी. लिंक लाईनसाठी 70 लाख रुपये रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आ. बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या या लिंक लाईनचे लोकांर्पण आज करण्यात आले.

तालुक्यातील खंडाळा, शिऊर या भागातील शेतकऱ्यांची या विद्युत वाहिनीची 2012 पासुन मागणी होती. परंतू पाठपुराव्याअभावी हा प्रश्न प्रलंबित होता. गेल्या दहा वर्षांपासूनची विद्युत वहिनीची मागणी आमदार बोरणारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रलंबित असलेला प्रश्न आज मार्गी लागला. उर्वरित सब स्टेशन देखील एका लाईन वर एकच करणार आहे त्यामुळे त्या सब स्टेशन वर लोड निर्माण होणार नाही.

.

शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रावर ओव्हर लोड असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त असते त्यासाठी देखील डीपीडीसी मधून जास्तीत जास्त विद्युत रोहित्र मंजूर करून ते काम देखील मार्गी लावेल असे आश्वासन आ.बोरणारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. तसेच संपुर्ण जिल्ह्यांत वसुलीच्या बाबतीत वैजापुर प्रथम आले असून सर्व शेतकऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी अधिक्षक अभियंता दरोली, कार्यकारी अभियंता दौंड, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, पंचायत समितीचे सभापती अंकुश पाटील हिंगे, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, उपतालुकाप्रमुख महेश पाटील बुणगे, युवासेनेचे श्रीराम गायकवाड, विभाग प्रमुख नानासाहेब जगदाळे, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, उपविभागप्रमुख पांडूरंग जगदाळे, उपकार्यकारी अभियंता पुंड, रविंद्र बाचकर, कनिष्ठ अभियंता पवार, अभिजीत सुराडकर, गुलाबराव पवार, सुखदेवभाऊ जगदाळे, बाळासाहेब चेळेकर, सुभाष जेजुरकर, किशोर जगदाळे, विजय मगर, रहिमभाई, रामभाऊ त्रिभुवन, विजय नाना मगर, प्रविण निपाणे, संदीप पवार, संजय मगर, अशोक मगर, बाबू खासाब, साजेद खान, सुनिल मगर, रत्नाकर पवार, मुकेश पवार, ज्ञानेश्वर मगर, नवनाथ सोनवणे, वाल्मिक पवार, पुंडलीक लोटे, किरण पवार, नानाभाऊ मगर, मोहमद भाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.