विजेच्या प्रश्नांवर लाडगाव येथे महावितरण कार्यालयावर मनसेचा मोर्चा

वैजापूर,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-लाडगाव येथील महावितरण उपकेंद्रांतर्गत थ्री फेज व सिगंल फेजवर वारंवार कमी दाबाने विद्युत पुरवठा व वीज खंडित होण्याचे प्रकिया वाढत आहेत. आठ तासाऐवजी पाच तासच विद्युत पुरवठा होत असल्याने अखडितं पूर्ण दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी मनसेच्यावतीने रविवारी येथील लाडगाव उपकेंद्रावर आक्रोश मोर्चा काढून आदोलंन करण्यात आले. 

परिसरातील बाभूळगांव, नादुरढोक, नारायणपुर, वाजरंगाव, सावखेडगंगा, लाडगाव, कापुसवाडगाव, म्हस्की, भऊर, हिंगोणी, कागोणी, नगिणा पिपंळगाव आदी गावांना सात फिडरद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु एका फिडरवर दोन गावे असल्याने उपकेंद्रामधील सर्वच फिडर थ्री फेज व सिगंल फेज वेळेत ओव्हरलोड होत आहेत. त्यामुळे त्यांना आठ तासाऐवजी काही गावांना चार ते पाच तासच विद्युत पुरवठा तोही कमी दाबाने होत असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरण कार्यालयात अखडीतं आठ तास व रात्रीचा सिगंल फेज पुर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने रविवार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे याच्यां मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून महावितरण विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळेस वीरगाव पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महावितरण चे अधिकारी यांनी दोन दिवसांत संपुर्ण गावांना पुर्ण दाबाने अखंडीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयश्री बागुल, मनसे नेते सुनिल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नंदू हिरडे, योगेश तुपे, महिला तालुका अध्यक्ष उषा कुमावत, मंगल गायकवाड, विष्णू चन्ने,  किशोर सुरासे, सत्यजित सोमवंशी, संतोष घंगाळे, गोविंद खटाणे, गोकुळ जाधव, प्रदिप जाधव, रुतुराज सोमवंशी, भगवान चौधरी, दत्तात्रय खटाणे, रवि डोगंरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे, नवनाथ कदम, महावितरण चे सहाय्यक अभियंता विराग सोनवणे, अनिल डुकरे उपस्थित होते.

ती गावे अद्यापही ओव्हरलोडच  : लाडगाव उपकेंद्रात नारायणपुर फिडर वरील नारायणपुर, हिंगोणी, कांगोणी या गावावंर जवळच पुरणगाव व खंबाळा हे नवीन उपकेंद्र होऊनही त्या उपकेंद्रावर अतिरिक्त गावांचा लोड कमी करण्याऐवजी  नवीन फिडरवर नवीन गावे जोडण्यात आली. यामुळे लाडगाव सबस्टेशन चा लोड कमी न झाल्याने व  नारायणपुर फिडरवर अतिरिक्त गावे जोडली. सहा महिने उलटूनही अद्याप त्या गावांना अतिरिक्त गावे असल्याने सदरील गावांना थ्री फेज व सिगंल फेजमध्ये वारंवार ओव्हरलोड व आठ तासाऐवजी पाच तासाचा विद्युत पुरवठा होत आहे. रविवारी आदोलंन स्थळी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सत्यजित सोमवंशी याच्यां उपस्थितीत येथील काकासाहेब चंदने, सुनील गिर्हे, रुतुराज सोमवंशी, शेषराव सोमवंशी आदींनी नारायणपुर फिडर वरील अतिरिक्त जोडलेल्या अन्य गावांचा लोड कमी न केल्यास चार तारखेला डीपीवर चढून तीव्र आत्मदहन आंदोलन करण्याचा ईशारा यावेळेस हिंगोणी, कागोणी,नारायणपुर येथील शेतकऱ्यांनी दिला.

ती गावे अद्यापही ओव्हरलोडच 

लाडगाव उपकेंद्रात नारायणपुर फिडर वरील नारायणपुर, हिंगोणी, कांगोणी या गावावंर जवळच पुरणगाव व खंबाळा हे नवीन उपकेंद्र होऊनही त्या उपकेंद्रावर अतिरिक्त गावांचा लोड कमी करण्याऐवजी  नवीन फिडरवर नवीन गावे जोडण्यात आली. यामुळे लाडगाव सबस्टेशन चा लोड कमी न झाल्याने व  नारायणपुर फिडरवर अतिरिक्त गावे जोडली. सहा महिने उलटूनही अद्याप त्या गावांना अतिरिक्त गावे असल्याने सदरील गावांना थ्री फेज व सिगंल फेजमध्ये वारंवार ओव्हरलोड व आठ तासाऐवजी पाच तासाचा विद्युत पुरवठा होत आहे. रविवारी आदोलंन स्थळी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सत्यजित सोमवंशी याच्यां उपस्थितीत येथील काकासाहेब चंदने, सुनील गिर्हे, रुतुराज सोमवंशी, शेषराव सोमवंशी आदींनी नारायणपुर फिडर वरील अतिरिक्त जोडलेल्या अन्य गावांचा लोड कमी न केल्यास चार तारखेला डीपीवर चढून तीव्र आत्मदहन आंदोलन करण्याचा ईशारा यावेळेस हिंगोणी, कागोणी,नारायणपुर येथील शेतकऱ्यांनी दिला.