वैजापूर तालुक्यातील 35 शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर व कृषी औजारांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते वाटप

वैजापूर,७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कृषी विभागाच्या महा डीबीटी योजनेअंतर्गत तालुक्यातील 35 लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप शुक्रवारी (ता.7) आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले काही शेतकऱ्यांना सुधारित ज्वारीच्या बियाणांचे वाटपही यावेळी करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात शासनाच्या कृषी विभागअंतर्गत MAHA DBT या योजनेमध्ये निवड झालेल्या वैजापूर तालुक्यातील 35 लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रक्टर, रोटा व्हिटर, नागर असे अनेक कृषी औजारांचे वितरण आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते झाले. तसेच काही शेतकऱ्यांना सुधारीत ज्वारीच्या बियाणे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, तालुका कृषी अधिकारी श्री. आढाव, नगरसेवक पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, उपतालुकाप्रमुख गोरख पाटील आहेर, महेश पाटील बुणगे, उपविभागप्रमुख पांडूरंग जगदाळे, दौलत गायकवाड, भावलाल काका सोमासे, रय्यस चाऊस, आत्माराम भाऊ दाणे, दादासाहेब गायके, प्रमोद गायकवाड, नवनाथ गायकवाड, प्रदिप गायकवाड, दिलीप भांडे, कृषी सहायक, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.