मन हे धर्म तसेच अधर्माचे कारण-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय

” स्वर्वेद ” हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

धर्माधर्महिं मनहिं है, स्वर्ग नर्क मन जान ।

बद्ध मुक्त भ्रम मनहिं है, मनहिं शत्रु अज्ञान ।।१३७।।

(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय)०६/०६/१३७

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :मन हे धर्म तसेच अधर्माचे कारण आहे. स्वर्ग आणि नरकाची प्राप्ति मनामुळे होते. मनात शुभ विचार येण्याने शुभ कर्म होतात. शुभ कर्मांचे फळ स्वर्ग-प्राप्ति आहे. मनात अशुभ भाव उदय झाल्यावर मनुष्य निंदित कर्मात संलग्न होतो  ज्याच्या परिणाम  नरकयातना भोग आहे. बंधनग्रस्त अवस्था मनाच्या अज्ञानामुळेच होते. मानसिक अज्ञानापासून मुक्ती हीच आत्म्याची मुक्तावस्था आहे अर्थात मनापासून पृथक् होऊन आत्मा आपल्या चेतन रूपात स्थित होऊन परमात्म्याची उपलब्धि करून मुक्त होतो. म्हणून मन हेच अज्ञानाचे कारण आणि सर्वात प्रबळ शत्रू आहे.
संदर्भ : स्वर्वेद

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org