औरंगाबादेत २९७ नवे कोरोनाबाधित,९ मृत्यू

जिल्ह्यात 12537 कोरोनामुक्त, 3955 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.10 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 191 जणांना (मनपा 53, ग्रामीण 138) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 297 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17050 झाली आहे. आजपर्यंत एकूण 558 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3955 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 223 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 68, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 41 आणि ग्रामीण भागात 98 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यातील २७ ते ६२ वयोगटातील आणखी नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सोमवारी (१० ऑगस्ट) दिवसभरात स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ५५८ झाली आहे. त्याचवेळी सोमवारी दिवसभरात २९७ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या १७,०५० झाली आहे.

नारेगाव येथील ५८ व गारखेडा येथील ३२ वर्षीय दोन महिला, तर मुकुंदवाडी येथील ५८, बीड बायपास येथील ६२, सिडको एन-चार परिसरातील ५७ व जयभवानी नगरातील ३३ वर्षीय चार पुरूष, अशा सहा करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. तसेच बायजीपुरा येथील २७ वर्षीय महिला, वैजापूर येथील शिवानी रोडवरील ६० वर्षीय पुरुष व कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील ५२ वर्षीय महिला, अशा तीन करोनाबाधित रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ४०९, तर जिल्ह्यात ५५८ बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *