ज्येष्ठ नागरिकांनी 14567 हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

औरंगाबाद,​२०​ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फौउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यान्वीत केली आहे, असे फौउंडेशनने कळविले आहे.

 हेल्पलाइनचा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन मुळे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे. तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी सहकार्याची गरज आहे.

 सदरील हेल्पलाइन टोल फ्री असून वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत सुरु राहिल. वर्षातील 365 पैकी 361 दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये 4 दिवस बंद असेल. यात  26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 1 मे महाराष्ट्र दिन या दिवसांचा समावेश आहे. सदर हेल्पलाइन मार्फत आरोग्य- जागरुकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, अध्यात्मिक, कला, करमणूक ई. माहिती देण्यात येते.

कायदेविषयक वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही, विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.) आर्थिक, पेन्शन, संबंधित, सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरण, नातेसंबंधविषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन वेळ, ताण, राग व्यवस्थापन मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. भावनिक समर्थनही करण्यात येते.  बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी ई. क्षेत्रीय पातळीवर मदत करण्यात येते. तरी या हेल्पलाईनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फौउंडेशने केले.