चांदेगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 15 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील चांदेगांव येथे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या प्रयत्नाने सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी 14 लाख 16 हजार 334 रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन बुधवारी (ता.14) शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, उपतालुकाप्रमुख सिताराम पाटील भराडे,  विभागप्रमुख भीमाशंकर पाटील तांबे, नागमठाणचे सरपंच दत्तू पाटील खुरूद, चांदेगांवच्या सरपंच निर्मला बाळासाहेब मापारी, उपसरपंच दादासाहेब बोधक, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पाटील काळे, सुजाता राजेंद्र चामले, कमलबाई साहेबराव बर्डे,  मुक्ता बाबासाहेब पवार, रंजना सतीश चामे, ग्रामसेवक अविनाश शिरसाट, संजू भाऊ बोधक, वाल्मिकी गिरी, अमोल चामे, आप्पासाहेब गव्हाणे, पांडू तात्या मापारी, बबन पवार, किशोर नरोडे, भगवान काळे, दादासाहेब काळे, बाबासाहेब पवार, पंडित चामे, सिताराम डांगे, बाळू पवार, संदीप बोधक, भास्कर मापारी, गोरख मापारी, संजय धीवर, भावराव बर्डे, भगवान धिवर, कोंडीराम भालेराव, नानासाहेब काळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.