पत्रकारांसाठी आमदार बोरणारे यांच्या निधीतून पत्रकार भवन बांधणार – माजी नगराध्यक्ष साबेर खान

वैजापूर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

वैजापूर,७ जानेवारी /प्रतिनिधी :-मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर नगरपालिकेच्या फुले – आंबेडकर सभागृहात गुरुवारी  रोजी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. पत्रकारांनी आपल्या भागातील विविध प्रश्न व समस्या मांडून निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करावी असे आवाहन वैजापूर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन नगराध्यक्ष तथा विद्यमान उप खान यांनी केले. पत्रकारांना सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  

पत्रकारांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. प्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला उपनगराध्यक्ष साबेरखान, नगरसेवक दशरथ बनकर, डॉ,निलेश भाटिया, गणेश खैरे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, ज्ञानेश्वर इंगळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड, सचिव मकरंद कुलकर्णी, मार्गदर्शक धोंडीरामसिंह राजपूत, घनश्याम वाणी, डॉ. बाबासाहेब इंगळे, नानासाहेब सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.प्रास्ताविकात धोंडीरामसिंह राजपूत यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला. यानंतर साप्ताहिक चित्तवेधक या वृत्तपत्रास सतरावर्ष पूर्ण होऊन अठराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्धल संपादक नाना साहेब सावंत यांनी काढलेल्या अंकांचे प्रकाशन उपनगराध्यक्ष साबेरखान व ईतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

काँग्रेस कमिटीचे  साहेबराव पडवळ यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. नंतर उपनगराध्यक्ष साबेरखान   मार्गदर्शन केले.पत्रकारांसाठी लवकरच एक पत्रकार भुवन आ.रमेश पाटील बोरनारे यांच्या निधीतून बांधून  देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नगरसेवक दशरथ बनकर, दिनेश राजपूत यांनीही मार्गदर्शन केले.या प्रसंगी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी, भानुदास धामणे, प्रशांत त्रिभुवन, समीर लोंढे, बाबसाहेब धुमाळ, सुनील त्रिभुवन, विलास म्हस्के, दीपक थोरे, दिपक बरकासे, अमोल राजपूत, राहुल त्रिभुवन, शैलेश खैरमोडे, किरणसिंह राजपूत, विशाल त्रिभुवन,डॉ. हरीश साबणे, आवेज खान, मन्सूरअली, अशोक साळुंके, अजयसिंह राजपूत, अशोक बोराडे, श्रीमती हंगे,यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार ही उपस्थित होते.शेवटी सुनील त्रिभुवन यांनी आभार मानले.