उपोषण सुरू करताच रस्त्याचे काम सुरू ; पंचायत समितीच्या सभापती व ग्रामस्थांच्या उपोषणाला यश

Displaying IMG-20220106-WA0168.jpg

वैजापूर,७ जानेवारी /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील लासुरगाव ,शहाजतपुर ,जळगाव व पालखेड या रस्त्याचे डांबरीकरण काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मनाजी मिसाळ यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी बुधवारी जळगाव येथे बाबाजी मंदिराच्या परिसरात उपोषण करण्यात आले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता  एस.डी. काकड व श्री. तांदळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. उपोषणाचे फलित म्हणून गुरुवारपासून रस्त्याच्या कामाला  (1किलोमीटर निकृष्ट दर्जाचे काम, रस्त्याच्या बाजूचे पंखे , डागडुजी, गटार, नाले) प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून राहिलेले डांबरीकरण 1 फेब्रुवारी पासून सुरू करणार असे लेखी आश्वासन दिले . 
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मनाजी पाटील मिसाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, भरतआण्णा जगताप , प्रविण सोनवणे, किशोर हुमे, विष्णू शेजुळ ,जयेश बनकर ,दादाभाऊ पगार , विठ्ठल डमाले, प्रवीण भाडाईत , विजय शेळके, सरपंच संभाजी पाटील जगताप , अरुण मातेरे ,राजेंद्र भाडाईत, कांतीलाल खारतोडे, दिलीप घेर, राजेंद्र नवले , प्रभाकर डोंगरे ,रावसाहेब बुणगे, सुरेश नवले, पंकज गायकवाड , सुनील पेमभरे, संदीप गाडे, राहुल मोरे, दिगंबर नवले ,संभाजी काळुंके, सरपंच किरणताई  जगताप यांच्यासह उपसरपंच सर्व सदस्य व पंचक्रोशीतील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.