पोखरी पंचायत समिती गणातील मौजे भटाणा येथे विविध विकास कामांचे माजी आमदार चिकटगावकर यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर,७ जानेवारी /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील पोखरी पंचायत समिती गणातील मौजे भटाणा येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्याहस्ते गुरुवारीकरण्यात आले.

पंचायत समितीच्या उपसभापती योगीताताई निकम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भटाणा येथील रस्ता बांधकाम, नवीन पाईप लाईन तसेच मौजे साकेगाव येथील धोबीघाट बांधकाम व पेविंग ब्लॉक लोकार्पण वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या हस्ते पार पडले. 
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  भागीनाथदादा मगर, माजी उपसभापती रिखब पाटणी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष  बाळासाहेब भोसले, मणुर ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पाटील साळुंके , सरपंच भीमराव अण्णा जाधव, सरपंच बापू नाना अव्हाळे, उपसरपंच भाऊसाहेब आव्हाळे, ,सचिन आव्हाळे, अण्णा निकम,  संतराम अण्णा , बापू मोगल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.