शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर मराठा सेवा संघाची नवी रणनीती

मुंबई : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर २०२४च्या निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवून मराठा सेवा संघाने नवी रणनीती आखली आहे. मराठा सेवा संघाची जबाबदारी आता तरुण कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. केवळ ३० टक्के जुने पदाधिकारी पदावर ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे.