15 ते 18 वर्षे वयोगटातील 50% हून अधिक किशोरवयीनांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

नवी दिल्ली,१९ जानेवारी /प्रतिनिधी :- वय वर्षे 15 ते 18 या गटातील 50%हून जास्त किशोर, किशोरींना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

“तरुण आणि युवा भारत आपल्याला मार्ग दाखवीत आहे!
ही अत्यंत उत्साहवर्धक बातमी आहे. आपण लसीकरणाचा हाच वेग कायम ठेवूया.

लसीकरण करून घेणे आणि कोविड संबंधी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण सर्व एकत्रितपणे या महामारीशी लढा देऊया.”