छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी शिवसेनेत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत

जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांचा पुढाकार
मुंबई,२ मार्च  /प्रतिनिधी :-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वात आज मुंबई येथे शेकडो भाजप पदाधिकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका श्रीमती बबीता चावरिया, भाजपा माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माझी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर, भाजपा मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजपा माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन खान, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. विरोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, सागर शिंदे, रंगनाथ राठोड आदी उपस्थित होते.