वैजापूर येथील मदर तेरेसा वसतिगृहात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली

वैजापूर,२१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा रुजलेलीआहे, तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न हीच खरी श्रद्धांजली डॉ.नरेंद्र दाभोळकर याना ठरेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी शनिवारी (ता.21) येथील मदर तेरेसा वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात केले.  
मदर तेरेसा मुलींचे वसतिगृह व संत रविदास वसतिगृहात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात राजपूत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनीनी  डोळस वृत्ती धारण करून समाजात  वैज्ञानिक दृष्टिकोन जगविण्यासाठी पुढाकार घ्यावा.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शाखेचे अध्यक्ष ऍड. प्रवीण साखरे होते. प्रथम डॉ.दाभोळकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी शाखेचे दिलीप अनर्थे, साहेबराव पडवळ यांची समयोचित भाषणे झाली. सूत्र संचालन व आभार प्रदर्शनं वस्तीगृह सचालक अण्णासाहेब ठेंगडे यांनी केले. या प्रसंगी रवी पगारे, विलास म्हस्के, दिलीप विश्वासू, दीपक खैरनार, अविनाश बागुल, सुरेखाताई ठेंगडे व वस्तीगृह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.