माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास खैरे- दानवेसह दिग्गजांची हजेरी

आमदार वाणी हे कुशल प्रशासक होते- हभप रामगिरी महाराज  

वैजापूर,२१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-तालुक्याचे माजी आमदार कै. आर.एम.वाणी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार (ता.20) रोजीद्रौपदी लान्स येथे श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प.रामगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. या स्मृतिदिन कार्यक्रमास जिल्हयातील राजकीय मंडळींनी हजेरी लावली.स्व.आर.एम. वाणी हे कुशल प्रशासक तसेच तालुक्याच्या विकास व उन्नतीसाठी स्वतःला झोकून दिलेले व्यक्ती होते. दूरदृष्टी असलेल्या या नेत्याचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असे हभप रामगिरी महाराज यांनी आपल्या किर्तनाप्रसंगी संबोधित करताना म्हणाले.


या प्रसंगी शिवसेना नेते, मा.खा.चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार अण्णासाहेब माने, येवल्याचे माजी आमदार मारोतीराव पवार, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, श्रीरामपूरचे माजी आ.भाऊसाहेब कांबळे, मा. नगराध्यक्ष साबेर खान,भाजपचे जिल्हा सरचिटणीस  डॉ.दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्यासह कोपरगाव ,येवला, गंगापूर, लासुर स्टेशन, कन्नड, औरंगाबाद येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 


सूत्र संचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले तर आभार मा.नगराध्यक्ष साबेरखान यांनी मानले.कै. आर.एम.वाणी यांचे चिरंजीव सखाहरी वाणी, देविदास वाणी, लिमेश वाणी, सचिन वाणी, भाऊ घनश्याम वाणी व पत्नी सुमनबाई वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.