दहीहंडी उत्सवाला गालबोट:मुंबईत १२ गोविंदा जखमी, एका गोविंदाचा मृत्यू
मुंबईच्या दहीहंडीवर आता भाजपचं कंट्रोल? दहीहंडीच्या आडून ‘मिशन महापालिका
मुंबई : मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून १२ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच दंहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे गोविंदांसह सर्वसामांन्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळालं. मात्र दुर्देवाने ज्याची भीती होती तेचं झालं. दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलंय. एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
हा सर्व धक्कादायक प्रकार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पंढरी गावात घडलाय. वसंत लाया चौगले असं या मृत गोविंदाचं नाव आहे.
नक्की काय झालं?
गावात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वसंत चौगुलेही दहीहंडीत सहभागी झाले होते. मात्र नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यामुळे गावातल्या दहीहंडी उत्सवावर शोककळा पसरली.
मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
रुग्णवाहिका गर्दीत अडकल्यामुळे रुग्णाचे हाल
दरम्यान, दादरमधील एक आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका गोविंदा पथकाचे थर लागून खाली उतरेपर्यंत एका जागी होती उभी होती. रुग्णवाहिका गर्दीत अडकल्यामुळे रुग्णाचे हाल झाले.
दादरमधील आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे गर्दीत एक रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णाचे हाल झाले. दादर पश्चिम येथील आयडियल गल्ली येथील श्री साई दत्त मित्र मंडळाने दहीहंडी आयोजित केली होती. या मित्रमंडळाच्या दहीहंडीत ही घटना घडली आहे. गोविंदा पथकाचे थर लागून उतरेपर्यंत रुग्णवाहिका एकाच जागी उभी होती. मात्र गोविंदा पथकाने आपले थर काही उतरवले नाहीत. त्याचबरोबर आयोजकांनी देखील या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. यामुळे आयोजकांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिशन महापालिका

मुंबई : महाराष्ट्रासह देशभर आज दहीहंडीचा उत्साह दिसून आला. दोन वर्षानंतर महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. पुन्हा एकदा मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापैकी बऱ्याच ठिकाणी भाजपचीच छाप दिसून आली. तर दहीहंडी म्हटलं की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची जी छाप दिसून यायची त्याजागी मात्र भाजपची आणि शिंदे गटाची छाप दिसून आली आहे.
आज मुंबईत जिथे दहीहंडी होती तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार होतं. म्हणजे आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र घरातून बाहेर पडले ते रात्री उशिरापर्यंत फक्त दहीहंडीच्या सोहळ्यांनाच हजेरी लावत होते. मराठी माणसाच्या सणाच्या आडून भाजपनं मुंबई महापालिकेआधी मराठी मतदारांना साद घातली आहे का? असा प्रश्न पडला आहे.
विशेष म्हणजे यंदा या सोहळ्यावर फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे गटाची छाप होती. ठाण्यात प्रकाश सुर्वे, घाटकोपरला राम कदम, वर्तकनगर प्रताप सरनाईक, टेंभी नाक्याला एकनाथ शिंदे, जांबोरी मैदान आशिष शेलार, ठाण्यात शिवाजी गावडे पाटील, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, पुण्यात बावधनमध्ये किरण दगडे पाटील अशा भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या हंड्या या जल्लोषात झाल्या.
कधीकाळी ज्या सणावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची छाप होती. ती आता भाजपच्या बाजूने वळली आहे. कारण ठाण्यातली संघर्ष प्रतिष्ठानची जितेंद्र आव्हाड आयोजित दहीहंडी कोरोनात बंद झाली. ती यंदाही बंदच राहिली. शिवसेनेची वरळीतल्या जांबोरी मैदानावरची दहीहंडी दुसरीकडे स्थलांतरित झाली. त्यातल्या त्यात ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्या दहीहंडीत आणि वरळीच्या श्रीराम मिलच्या हंडीमध्ये थोडीफार रंगत दिसली.