सिरसगाव सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

वैजापूर,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापुर-गंगापूर मतदारसंघांतील मौजे सिरसगाव गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच सर्व नवनिर्वाचित संचालकानी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली.  आमदार बोरणारे यांनी सिरसगाव सेवा सहकारी संस्थेवर चेअरमनपदी  कांताबाई नेहे व व्हाईस चेअरमनपदी बंडू पाटील वराडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्यासह गावातील सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले. 

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, नवनिर्वाचित संचालक बाबासाहेब सातपुते, एकनाथ साळवे, ज्ञानेश्वर वायळ,  मुक्ताबाई धात्रक, शिवाजी राऊत, सोमनाथ नेहे, रामेश्वर नेहे, लक्ष्मण नेहे, हौशीराम धात्रक यांच्यासह प्रमूख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.