जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारळा येथे वीर एकलव्य यांची मिरवणूक

वैजापूर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील पारळा येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केले.

रथामधून वीर एकलव्य यांची प्रतिमेची ढोल ताशाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या मिरवणुकीत गणेश पवार, संजय आहेर, राजू सोनवणे, रामदास भागवत, महादू मोरे,  लहानु ठाकरे, श्रावण पवार, पुंजाराम ठाकरे, पुंडलिक मोरे, गोरख सोनवणे, सोमनाथ मोरे, अशोक मोरे, अशोक पवार, कैलास मोरे, पारसनाथ मोरे, गुलाब मोरे, विजय मोरे, भाऊलाल ठाकरे, उखा पवार, संतोष पवार आदी सहभागी झाले होते.