वैजापूर तालुक्यातील भिंगी येथे आ.बोरणारे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन

वैजापूर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील भिंगी येथे 14 लाख 89 हजार रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन व स्थानिक विकास निधीतून 5 लाख रुपये निधीच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण आ.रमेश बोरणारे यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
पाणी पुरवठा विभागाकडून वैजापूर तालुक्यासाठी 30 कोटी 41 हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीतून ही कामे करण्यात येत आहे. तर स्थानिक विकास निधीतून हनुमान मंदिर परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.या भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप,  अरूण होले, मयुर राजपूत, गोरखनाथ शिंदे, विभागप्रमुख प्रकाश मतसागर, उपकार्यकारी अभियंता कोयलवार , कीर्तने , सरपंच उज्वला घायवट, काकासाहेब गायकवाड, उपसरपंच प्रविण शेवाळे, अशोकराव घायवट, विलासनाना पवार, संजय पवार, श्यामराव गायके, प्रभाकर सोनवणे, आत्माराम गायकवाड, नवनाथ गायके, राजेश मुंगी, कैलास घायवट, योगेश घायवाट, कडुभाऊ गायकवाड, कृष्णा तांबे, संजय घायवाट, भिमराज गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.