आगामी निवडणुकासंदर्भात बहुजन समाज पार्टीची खंडाळा येथे शुक्रवारी बैठक

वैजापूर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसंदर्भात बहुजन समाज पार्टीची बैठक शुक्रवारी खंडाळा ता. वैजापूर येथे होणार आहे.

बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव  पंडितदादा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून प्रदेश सचिव, सचिन बनसोडे प्रदेश सचिव कैसर कुरेशी, जिल्हाध्यक्ष समाधान जाधव,  जिल्हा महासचिव विजय बचके, जिल्हा सचिव अमोल पवार, औरंगाबाद शहराध्यक्ष आयुब पटेल, औरंगाबाद जिल्हा सचीव, राजेश नरवाडे, साजिदबाबा सय्यद यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  वैजापूर विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या सर्व  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे वैजापूर विधानसभा अध्यक्ष संतोष पठारे, उपाध्यक्ष बाळू शिनगारे व सचीव नितीन निकम यांनी केले आहे.