शिऊर येथील श्री.शंकरस्वामी महाराज सप्ताहास आ.बोरणारेंकडून 77 पोती साखरेची देणगी

वैजापूर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे श्री.शंकरस्वामी महाराज यांनी प्रारंभ केलेल्या श्रीक्षेत्र शिवूर फडाचा 277 वा अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह सध्या सुरू आहे. ह.भ.प.श्री.पंढरीनाथ पगार महाराज यांच्या कीर्तनाप्रसंगी आमदार रमेश बोरणारे यांनी गुरुवारी (ता.4) भेट देऊन सप्ताहासाठी 77 पोते साखरेसाठी आर्थिक स्वरुपात देणगी आज सप्ताह कमेटीकडे ह.भ.प.पगार महाराज यांच्याहस्ते सुपूर्द केली. 


या प्रसंगी प.पू.भोलगिरी महाराज, माजी नगराध्यक्ष साबेरभाई, भाजपा प्रदेश कार्यकरणी सदस्य एकनाथराव जाधव, माजी सभापती बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव,महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, उपसभापती राजेंद्र चव्हाण, उपतालुकाप्रमुख गोरख आहेर, बबनतात्या जाधव, गोकुळ आहेर, विभागप्रमुख प्रकाश मतसागर, उपविभागप्रमुख अंबादास खोसे, पांडूरंग जगदाळे, चांगदेव जाधव, सुभाषबापू जाधव, राजुभाऊ काटे, संजय पवार, सरपंच मंगेश जाधव, प्रभाकर सोनवणे, दिलीप जाधव, काकासाहेब गायकवाड, आत्माराम जाधव, नितीन शेठ चुडीवाल, अनिल भोसले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते