वैजापूर तालुक्यात हिंगणे-कन्नड ग्रामपंचायतसह 46 जागा बिनविरोध ; सरपंचपदासाठी 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

वैजापूर, ९ डिसेंबर / प्रतिनिधी :-ऑक्टोबर व डिसेंबर 2022 मध्ये मुदती संपणाऱ्या तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीसाठी ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत बहुतांश जणांनी माघार घेतली. तसेच तालुक्यातील हिंगोणी ग्रामपचायतींसह अन्य ग्रामपंचायतींच्या एकूण 46 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या 24 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 79 व सदस्य पदांच्या 169 जागांसाठी 382 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून यासाठी 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 2 डिसेंबरपर्यंत सरपंच पदासाठी 155 व 77 प्रभागातील सदस्य पदांच्या 215 जागांसाठी 615 असे एकूण 770  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 5 डिसेंबर रोजी झालेल्या छानणीत ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी दाखल करण्यात आलेल्या 12 जणांचे अर्ज अवैध ठरले. तसेच सरपंच पदांसाठी दाखल करण्यात आलेले सर्वच्या सर्व दाखल करण्यात आलेले 155 अर्ज वैध ठरले. दरम्यान 7 डिसेंबर हा  इच्छुकांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी अंतिम दिवस देण्यात आला होता. सरपंच पदांसाठी दाखल करण्यात आलेल्या एकूण 155  उमेदवारी अर्जापैकी 70 जणांनी माघार तर हिंगणेकन्नड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकच अर्ज राहिल्याने ते पद बिनविरोध झाले. याशिवाय ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी वैध 603 अर्जापैकी 179 जणांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले. तालुक्यातील हिंगणेकन्नड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासासह अन्य पूर्ण सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच तालुक्यातील अन्य विविध ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या 39 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 24 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी 79 व सदस्य पदांच्या 169 जागांसाठी 382 उमेदवार आता निवडणूक आखाड्यात आहेत.

हिंगणेकन्नड ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतींच्या बिनविरोध झालेल्या जागा अशा –

हिंगणेकन्नड

सरपंच : मंगेश निकम

सदस्य : भाऊसाहेब निकम, सुमित म्हस्के, रंजना निकम, रामदास निकम,

राधाबाई काळे, नीलेश निकम, आशा निकम, खरज- तित्तरखेडा :   अनिता पठारे, अव्वलगाव-हमरापूर : शेख जबीना, विजय मोरे, अश्विनी पठारे, गोळवाडी-मिरकनगर : छाया कोकाटे, सुमनबाई पवार, सुनील डुकरे, भग्गाव : लता रहटकळ, हिलालपूर : सचिन सोनवणे, इस्माईल सय्यद,वैशाली पवार,  नांदूरढोक-बाभूळगावगंगा : योगेश घंगाळे, जयश्री निकम, शांता गायकवाड, ज्योती फणसे, नारायण  घोडे, उदयकुमार कुंजीर, रंजना हिरडे, नादी : अरुण गायकवाड, रुपाली लांडे, वंदना काळे, (प्रभाग क्रमांक 01 मधील 01 जागा रिक्त), रोटेगाव : सोनल राजपूत, तिडी : कडूबाई गवळी, वांजरगाव : अझर सय्यद, पार्वतीबाई साळवे, खिर्डी : सचिन तांबे, शकुंतला तांबे, इंदूबाई तांबे, ताईबाई तांबे, पुरणगाव : दत्तात्रय ठोंबरे, हिराबाई कसबे, सुरेश ठोंबरे, संगीता ठोंबरे, भिकाजी ठोंबरे, रंजना लोखंडे 

या ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका…

महालगाव,पानवी बुद्रुक/वक्ती,अव्वलगाव/हमरापूर, बाबतारा,बेलगाव,भग्गाव/डाकपिंपळगाव,गोळवाडी/मिरकनगर,हनुमंतगाव,हिलालपूर /कोरडगाव,कनकसागज,कविटखेडा/बिरोळा, कोल्ही,खरज/ तित्तरखेडा, खिर्डी / हरगोविंदपूर,माळीघोगरगाव,नादी,नांदूरढोक/बाभुळगावगंगा,पाराळा, पुरणगाव,रोटेगाव, टुणकी, तिडी / मकरमतपूरवाडी  व वांजरगाव.