भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात 200 कोटी पेक्षा जास्त लसमात्रा दिल्याबद्दल बिल गेट्स यांनी केले पंतप्रधानांचे अभिनंदन

हे वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि परिचरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली,२० जुलै /प्रतिनिधी :- भारताची लसीकरण मोहीमेला बळ देण्याचे  श्रेय देशातले वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्या एकत्रित प्रयत्नांना आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.

भारताने कोविड लसीकरणात 200 कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा पार केल्याबद्दल बिल गेट्स यांनी भारताचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या ट्वीट ला उत्तर देतांना पंतप्रधान म्हणाले –

“भारताची लसीकरण मोहीम गती आणि व्याप्ती दोन्ही दृष्टीने अत्यंत भव्य आहे. देशातले वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्यासह अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या मोहिमेला बळ मिळाले आहे. त्याचवेळी भारताच्या जनतेने विज्ञानावर विश्वास दर्शवत आपल्या लसमात्रा वेळेत घेतल्यानेही ही मोहीम यशस्वी झाली आहे.”