नांदेड जिल्ह्यात222 कोरोना बाधितांना सुट्टी, 170 बाधितांची भर

नांदेड दि. 9 :- शुक्रवार 9 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 222 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 170 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 112 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 352 अहवालापैकी 1 हजार 171 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 170 एवढी झाली असून यातील एकूण 13 हजार 909 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 710 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 63 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 91 हजार 20,निगेटिव्ह स्वॅब- 70 हजार 564,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 170,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 909,एकूण मृत्यू संख्या- 448,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 83.69आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-0,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 623, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 710,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 63.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.