गेल्या 24 तासात 50,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद

बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील फरक निरंतर वाढता

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2020

भारतात गेल्या 24 तासात 50,000 पेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद होण्याबरोबरच 45,675 नागरिकांची कोविड–19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 15 ऑक्टोबरपासून दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी होत आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचा रुग्णदर कायम ठेवत, 49,082 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. हाच दर आज सलग  37 व्या दिवशी नोंदविला गेला आहे. सध्याची 5.12 लाख सक्रिय रुग्ण संख्या कमी राखण्यात याची मुख्य भूमिका आहे.आज सक्रिय रुग्णांची संख्या 5,12,665 इतकी आहे. ही संख्या भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ 6.03 % संख्येचा समावेश आहे, जी सतत कमी होणारा रुग्ण संख्या दर दर्शविते.रुग्ण बरे होण्याचा 92.49% दर  हा बरे झालेल्या 78,68,968 इतक्या रुग्णांची संख्या दर्शवितो. बरे झालेल्यांची संख्या आणि सक्रिय रुग्ण संख्येतील अंतर सध्या 73,56,303 इतके आहे. हे अंतर निरंतर वाढत आहे.

नव्याने बरे झालेल्या 76 % रुग्णांची नोंद 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील असल्याचे लक्षात आले आहे.एकाच दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यामध्ये केरळने महाराष्ट्राची जागा घेतली आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात 7,120 रुग्ण बरे झाले आहेत तर महाराष्ट्रात 6,478 रुग्ण बरे झाले आहेत.

76 % नवीन रुग्ण हे 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.केरळमध्ये गेल्या 24 तासात 7,201 रुग्णांची नोंद झाली आहे, तर जवळपास त्याच प्रकारे दिल्ली येथे 6,953 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असून काल 3,959 नवीन रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात 559 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.यापैकी, 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग 79 % टक्के आहे. 26.8 % पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्रातून (150 मृत्यू) झाली आहे. दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 79 आणि 58 मृत्यूंची नोंद करण्यात आहे.