जनावरांची वाहतुक, बाजार आणि जत्रा-प्रदर्शने आयोजित करण्यास बंदी

परभणी, दि.9 :-जिल्ह्यात गायवर्गीय व म्हैसवर्गीय जनावरांना लंम्पी स्कीन रोगाचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व दि.21 सप्टेंबर 2020 च्या अधिसुचनेनूसार परभणी जिल्ह्याअंतर्गत गायवर्गीय व म्हैसवर्गीय जनावरांची वाहतूक, बाजार व जत्रा-प्रदर्शने आयोजित करण्यात येवू नये, असे आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश दि.1 ऑक्टोबर 2020 पासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.