रुग्णाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून डॉक्टरांच्या डोळ्यात आले अश्रू …..

निलंगा ,२२एप्रिल /श्रीशैल बिराजदार

निलंगा उपजिल्हा रूग्णालयात  गेल्या नऊ दिवसापासून एका हाय शुगर व बी.पी. असलेल्या कोरोनाबाधित रूग्णावर  उपचार सुरू आहेत.  अचानक गंभीर आवस्थेतील रूग्ण उपचाराला प्रतिसाद देत डॉक्टरांना पाहून हसला…. अन रुग्णाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या डोळ्यात अश्रू आले.

सध्या येथील उपजिल्हा रूग्णालयात साठ खाटावर कोरोना संक्रमित रूग्णावर उपचार केले जात असून ज्या रूग्णास शुगर, बीपी व स्कोअर अधिक झाल्यानंतर रेमडीसिव्हअर इंजक्शन मिळत नाही म्हणून पूढील उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवले जाते गेल्या दहा ते पंधरा दिवसापर्यंत अशा रूग्णावर उपचार केले जाते शिवाय गंभीर झालेले रूग्ण भर्ती होत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे नातेवाईक चिंतित होत आहे. येथे दोन विभाग तयार करण्यात आले असून जवळपास 79 गंभीर रूग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.

गंभीर रुग्णासाठी स्वतः वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे चार-पाच वेळा राउंड करीत असतात. रूग्णाची तपासणी करीत असताना येथे हाय शुगर व हाय बी.पी. असलेल्या कोरोना संक्रमित रूग्णावर गेल्या नऊ दिवसापासून उपचार सुरू आसतांना डॉक्टरकडून आॕक्सिजन लेवल सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गंभीर रूग्ण वाचावे म्हणून डॉक्टरांची टिमही झटत असते मात्र नऊ दिवसापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रूग्ण जेव्हा डॉक्टरकडे पाहून हसला तेव्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे यांना अश्रू अनावर झाले अन् आता रूग्ण वाचणार असा आत्मविश्वास त्यांना आला. रूग्णाकडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत गेला तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांला हुरूप येतो शर्थीचे प्रयत्न करूनही रूग्ण हातात येत नसेल तर मनाला फार वाईट वाटते. कधी कधी रात्र रात्र झोप येत नाही अशी भावनिक प्रतिक्रिया वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली.   रूग्णाचा अनुभव सांगताना डॉ.सौंदळे भावूक झाले होते. शिवाय सध्या येथील उपजिल्हा रूग्णालयात क्षमता कमी व रूग्ण आधिक अशी स्थिती झाली असून    उपचार करण्यासाठीसाठी स्टाफ कमी पडत आहे. रूग्णाच्या नातेवाईकांनी आम्हालाही समजून घेतले पाहीजे. रूग्णाच्या उपचारासाठी वेळ देणे महत्त्वाचा आहे. मात्र  नातेवाईकांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जाण्यातच जास्त वेळ जात आहे. कोरोनाचा संसर्ग तिव्र असून शासनाने जाहीर केलेले नियम नागरिकांनी पाळावे, कोणताही आजार साधा समजून अंगावर काढू नये, रूग्ण गंभीर आहेत. शेवटी आम्हीही माणसंच आहोत अशी भावनिकता त्यांनी व्यक्त केली. 

सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असून गावागावात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. शासनाकडून संचारबंदी जाहीर केली आसली तरी नागरिकांना याचे फारसे गांभीर्य दिसत नसून मागील वर्षी विषाणूची तिव्रता कमी आसतांना व केवळ जेष्ठ नागरिकच संक्रमित होत होते. त्यावेळी कडक शिस्त पाळली यावेळी विषाणूची तिव्रता अधिक असताना व तरूण, मध्यमवर्गीय वयाची व्यक्ती कोरोना रोगाच्या विळख्यात सापडत आहेत. शिवाय रूग्णही लगेच गंभीर होत आहेत. सर्दी, ताप, खोकला अंगावर काढणे जिवावर बेतले जात आहे. प्रारंभी लक्षणे दिसल्यानंतर प्रथोमपचार करणे गरजेचे आहे. कांही खाजगी रूग्णालयात प्राथमिक उपचार करून रूग्ण गंभीर झाल्यानंतर येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवले जात आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांना गंभीर झालेल्या रूग्णास वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.