जालना जिल्हा परिषद: शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे आंदोलन

निवेदन घेण्यासाठी शिक्षण अधिकारी ,उप शिक्षण अधिकारी  गायब 

जालना,१९ जुलै /प्रतिनिधी :-आज मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने  जिल्हा परिषद जालना येथे आज शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन  करण्यात आले.

(१)जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी,(2)  विना अनुदानित शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे (3)राज्यातील शिक्षक ,शिक्षकेतर ,कर्मचऱ्याना 10,20,30 आशा तीन लाभाची अश्वाशीत  प्रगती योजना  लागू करावी (4)16 मार्च 2019 चा शासनादेश रद्द करून मोफत   शिक्षण सुरू करावे(5)शक्षणिक संस्था च्या वेतणानुसार सातवा वेतन आयोग लागू करावा (7)शिक्षकाची   रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी (8)शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी (9)
10 जानेवारी 22 पासून महागाई भत्ता देण्यात यावा.(10)शिक्षकांना वैदकीय उपचारासाठी स्मार्ट कार्ड देऊन उपचाराची सुविधा उपलब्ध करावी (11)सेवा निवृत्त शिक्षकांना वैदकीय परिपूर्ती  योजना लागू करावी (12)सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा ,तिसरा हप्ता सेवानिवृत्त व एनपीएस कर्मचऱ्याना रोखीने देण्यात यावा(13)शिक्षक कर्मचऱ्याचे सेवानिवृत्त वय 60 करावे( 14)शिक्षक कर्मचऱ्याचे भरती बंदी उठवावी (15)शालार्थ प्रणालीत नवे समाविष्ट करण्यासाठी जाणीव पूर्वक होणार विलंब थांबवावा(16)सेवेत असताना दिव्यगवंत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या खासगी (अनुदानित ,अनुदानित)शिक्षक कर्मचऱ्याच्या वारसांना अनुकम्प त्वतानुसार नियुक्ती देण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी मराठवाडा  शिक्षक संघाच्या वतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे  आंदोलन करण्यात आले होते .वरील मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले होते.

पण आज जिल्हा परिषदेचे   शिक्षण अधिकारी,व उप शिक्षण अधिकारी कार्यालयात   हजर नसल्याने  मराठवाडा  शिक्षक संघाचे आंदोलन कर्त्यांनी  शिक्षण अधिकारी यांच्या दालनासमोर बसून  आंदोलन केले .जोपर्यंत शिक्षण अधिकारी, उप शिक्षण अधिकारी आपल्या कार्यालयात येऊन मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत  आंदोलन मागे घेतले जाणार  नाही अशी भूमिका   मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने घेण्यात आली.या आंदोलनामध्ये  मराठवाडा शिक्षक संघाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून  प्रा.डॉ. मारोती तेगमपुरे,केंद्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे,श्रीमान प्रेमदास राठोड श्री आरेफ कुरेशी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री रमेश आंधळे ,सचिव श्री संजय  येळवंते,उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे , श्री एस एस सय्यद ,जगन वाघमोडे ,नारायण मुंडे ,दीपक शेरे,  प्रद्युम्न काकड , संतोष शिरस श्री तुकाराम पडघम,  गौतम बनसोडे , डॉ.रमेश वाघमारे, डॉ. पुरुषोत्तम जुन्ने , डॉ. बभागवत काकडे , राजपूत, बापू मुळे, गणेश तागड, राजेंद्र पाटील, प्राध्यापक रमेश गाडे, विष्णू इतर, दत्तात्रय राऊत, भानुदास नन्नवरे, प्रल्हाद वाघ, विष्णू सोलाटे, अनंत जायभाय येडे, प्रा वाघमारे श्री भगवान धनगे श्री हकीम पटेल असे बहुसंख्येने मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते