नांदेड जिल्ह्यात 154 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

नांदेड दि. 31 :- जिल्ह्यात आज 31 जुलै रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 41 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 154 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 746 अहवालापैकी 471 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 839 एवढी झाली असून यातील 887 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 859 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे.

बुधवार 29 जुलै रोजी हिंगोली गेट नांदेड येथील 67 वर्षाचा एक पुरुष, गुरुवार 30 जुलै रोजी मिलगेट नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 69 वर्षाच्या एक महिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 81 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 41 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 6, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 3, लोहा कोविड केअर सेंटर येथील 3,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 13, कंधार कोविड केअर सेंटर येथील 4, खाजगी रुग्णायातील 4, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 5,जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1 अशा 41 कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 859 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 145, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 292, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 33, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 23, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 20, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 99, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 46, लोहा कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर 25, भोकर कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर येथे 11, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 33, किनवट कोविड केअर सेंटर येथे 10, खाजगी रुग्णालयात 109 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 4 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 2 तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 305,
घेतलेले स्वॅब- 14 हजार 30,
निगेटिव्ह स्वॅब- 11 हजार 347,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 154,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 839,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 2,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 28,
मृत्यू संख्या- 81,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 887,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 859,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 342.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *