परिस्थिती कोणतीही असो, ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी सदैव राहू – निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांचा शिवगर्जना मोहिमेत निर्धार

शिवगर्जना अभियानास शिवसैनिकांची उस्फुर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर,१ मार्च  / प्रतिनिधी :-  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे शिवगर्जना अभियान अंतर्गत भव्य मेळावा तापडिया नाट्य मंदिरात पार पडला. परिस्थिती कोणतीही असो, ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी सदैव राहू, असा निर्धार निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांनी शिवगर्जना मोहिमेत केला. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत आघाडी यांनी शिवगर्जना अभियानास गर्दी केली.
मुंबईच्या माजी महापौर पेडणेकर यांनी सांगितले की, आता हेवेदावे विसरून गद्दाराना गाडण्यासाठी सज्ज व्हा. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वादळ आता कुणीही रोखू शकत नाही. झेरॉक्स कॉपी झेरॉक्स असते, त्यामुळे मूळ शिवसेनेसोबत कायम राहा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले.
धनुष्यबाण चिन्ह चोरले, उद्या मशाल चिन्ह चोरण्याचा डाव सुरू आहे, त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच आपले चिन्ह आणि पक्ष आपले कायम असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
माजी आमदार अनिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शिवसैनिक हा आदेशाचे पालन करणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या संकटात हा निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे कुटुंबांच्या पाठिशी कायम असल्याने विरोधकही हतबल झाले.
युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी सांगितले की, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासैनिक भक्कमपणे काम करत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसैनिक आणि युवासैनिक निवडणूकित दाखवेल असा विश्वास व्यक्त केला.
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी केंद्र आणि राज्यसरकार वर टीका केली. ईडीच्या धास्तीने भाजपमध्ये गेलेल्या आता कसे चांगले झाले, याचे ते उत्तर द्या. येणाऱ्या निवडणूक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन डॉ.मुंदडा यांनी केले.
जिल्हा युवाअधिकारी हनुमान शिंदे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाममामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, संतोष जेजुरकर, बाप्पा दळवी, अशोक शिंदे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहर संघटक भागूबाई शिरसाठ, विद्या अग्निहोत्री, आशा दातर, जिल्हा युवती अधिकारी सानिका देवराज, युवासेना सरचिटणीस किरण तुपे, जिल्हा समनव्यक पुनमचंद सलामपुरे, उपजिल्हाधिकारी प्रकाश धुर्वे, नारायण सुरे, शहर अधिकारी सागर खरगे, स्वप्नील दिंडोरे, रामेश्वर कोरडे, आदित्य दहिवाल, बजाजनगर शहरप्रमुख सागर शिंदे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी केले.
यावेळी उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, मकरंद कुलकर्णी, संजय बारवाल, माजी नगरसेवक सचिन खैरे, वसंतभाई शर्मा, अनिल जैस्वाल, किशोर नागरे, गिरीजाराम हालनोर, अशोक बावसकर, मनोज गंगवे, कमलाकर जगताप, प्रफुल्ल मालानी, स्वाती नागरे, सुमित्रा हालनोर, शिवा लुंगारे, अजय चोपडे, नारायण जाधव, भरत लकडे, विजय सूर्यवंशी, जयसिंग होलीये, राम वारेगावकर, प्रमोद ठेंगडे, सुगंधकुमार गडवे, संतोष खेंडके, अनिल लहाने, वल्लभ भंडारी, सतीश कटकटे, शिवाजी आपरे, उपतालुकाप्रमुख सचिन गरड, विशाल खंडागळे, चंदू गवई, चंद्रकांत देवराज, जया गुदगे, सुरेश पवार, आदेश जाधव, संदेश कवडे, नितीन पवार, गौरव पुरंदरे, राहुल सोनवने, प्रतीक अंकुश, संदीप हिरे, मनोहर वनकर, बंटी जैस्वाल, शाहू चित्ते, किरण गणोरे,
कृष्णा मेटे, मनिष दहीहडे, लवू इमले, समाधान बनकर, स्वप्नील पाटील, विशाल सानप, महेंद्र ठाकूर, देविदास रत्नपारखी, अमोल निकाळजे, दिनेश तिवारी, राजू इंगळे, विनायक देशमुख, सचिन लकासे, सिताराम सुरे, विष्णू गुंठाल, रवी गंगवे, सागर वाघचौरे, सौरभ साळवी, राजू गरड, बापू कवले, नारायण आघाव, कृष्णा भोसले पाटील, दीपक सूर्यवंशी, साहेबराव साबळे, मयुर कंटे, मंगल राजपूत, संतोष खोंडकर, सुरेश व्यवहारे, निलेश घुले, मंगेश भाले, रवी देशमुख, शंकर भारती, विनोद माने, मंगेश वाघमारे, लक्ष्मण पिवळ, वल्लभ भंडारी,
महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक दुर्गा भाटी, अंजली मांडवकर, नलिनी बाहेती, सुनंदा खरात, जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक नलिनी महाजन, मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, अंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, राखी सुरडकर, रेणुका जोशी, छाया देवराज, राजश्री पोफळे, किरण शर्मा, स्मिता जोशी, विजया त्रिभुवन,पुष्पा राजे, कमल चक्रे, सुकन्या भोसले, सुनीता सोनवणे, अरुणा भाटी, भारती हिवराळे, वैशाली आरट, कविता मठपती,वंदना कुलकर्णी, पुष्पा राजे , आंबेकर, कविता सुरडकर, सुनीता औताडे, सारीका शर्मा, लता त्रिवेदि, सीमा गवळी, वनमाला पटेल,
वनमाला पटेल, अंजना गवई, मनीषा बिराजदार शोभा साबळे, रोहिणी काळे, अनिता खोंडकर,
युवासेनेचे मधुर चव्हाण, सचिन वाघ, मनोज क्षीरसागर, प्रशांत कुर्हे, योगी ओळेकर, दत्ता कणसे, योगेश जगताप, साई थोरवे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

महागाईच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने

गॅसमध्ये झालेल्या दरवाढीचा निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संभाजीनगर येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.