औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार पार

जिल्ह्यात 15152 कोरोनामुक्त, 4270 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 21 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 जणांना (मनपा 138, ग्रामीण 87) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15152 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20044 झाली आहे. आजपर्यंत एकूण 622 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4270 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 46, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 77 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (113 )औरंगाबाद (4), फुलंब्री (2), गंगापूर (27), कन्नड (11), वैजापूर (1), पैठण (1), सोयगाव (5)म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), बाजारपेठ सिल्लोड (5), निल्लोड, सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (1),बिडकीन (1), ओम वृंदावन, वाळूज (2), वाळूज एमआयडीसी (1), गंगापूर (1), कावसान पैठण (1), पिशोर, कन्नड (1), पैठण (1), गणेश नगर, रांजणगाव (1), गुरूधानोरा, गंगापूर (1), सिल्लोड (1), वडोदबाजार, फुलंब्री (1), विहामांडवा (1), अंबिका नगर, विहामांडवा (1), शहाजातपूर (1),वडगाव (1), बजाज नगर (1),पारिजात नगर, म्हाडा कॉलनी (1), खडकी तांडा (1), नंदा तांडा (1),ठाकूर मळा, रांजणगाव (7), कमलापूर फाटा (3), नांदूरढोक, वैजापूर (7), करमाड (1),इंदिरा नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (5), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), घोडेगाव, गंगापूर (1), बाबरगाव, गंगापूर (1),जीवनगंगा, वैजापूर (1), खंडाळा (1), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (1), वीरगाव, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1)

मनपा (120)कर्करोग रुग्णालय परिसर (1), नर्सिंग हॉस्टेल (1), गजानन नगर (1), प्रोझोन मॉल (1), गणेश नगर, पडेगाव (1), जाधववाडी (1), दिल्ली गेट परिसर (4), हर्सुल (1), कैसर कॉलनी (1), सदगुरूकृपा सो., सिडको (1), पडेगाव (1), अहिंसा नगर (2), व्यंकटेश नगर (1), महेश नगर (1), शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), गुरूकृपा सो., इटखेडा (1), मनजित नगर (2), केबीएच नर्सिंग हॉस्टेल (2), देवडी बाजार, सिटी चौक (1), कांचनवाडी (1), शिवाजी नगर (1), मयूर पार्क (1), सातारा गाव, सातारा परिसर (1), सदाशिव नगर (1), विवेकानंद नगर (1), पुंडलिक नगर (1), नागेश्वरवाडी (2), केएफसी कंपनी (1), अंबिका नगर (4), मुकुंदवाडी (1), विश्वभारती कॉलनी (1), अमरप्रित हॉटेल (1), जय भवानी नगर (1), प्रताप नगर (1), अन्य (6), गुरूदत्त नगर (6), उल्का नगरी (1), सावननगरी, गारखेडा परिसर (2), खडकेश्वर, उदय कॉलनी (1), क्रांती नगर (3), कैलास नगर (1),अहिंसा नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (1), नूतन शांतीनिकेतन कॉलनी (1), विश्रांती नगर (1), भारत नगर (1), जटवाडा रोड, शहिद कॉलनी (1), अन्य (1), म्हाडा कॉलनी, एन सात (2), शांती नगर (1), जाधववाडी (2), हर्सुल (1), बायजीपुरा (1), संघर्ष नगर,एन दोन (1), जवाहर कॉलनी (1), रमा नगर (2), राजीव गांधी नगर (5), एसटी कॉलनी (2), भावसिंगपुरा (1), कोमल नगर, पडेगाव (3), इटखेडा (2), जिन्सी आरोग्य केंद्र परिसर, नवाबपुरा (4), न्यू बालाजी नगर (1), भवानी नगर (1), राहुल नगर (7), कांचन नगर, नक्षत्रवाडी (1), प्रोझोन मॉल (4), राधास्वामी कॉलनी, चेतना नगर (2), गुरूदत्त नगर (2), मुकुंदवाडी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1)

सिटी एंट्री पॉइंट (40)पैठण (1), विहामांडवा (1),गंगापूर (3), लासूर स्टेशन (1), वाळूज एमआयडीसी (2), रांजणगाव (1), बजाजनगर (1), उल्कानगरी (1), सोयगाव (1), वैजापूर (1), हर्सूल (1), कन्नड (1), सुरेवाडी (1), एन अकरा (1), मयूर पार्क (5), एन बारा, सिडको (1),मिसरवाडी (3), जटवाडा (1), बीड बायपास (1), श्रीकृष्ण नगर (1), पैठण खेडा (5), प्रकाश नगर (1),म्हाडा कॉलनी (3), सातारा परिसर (1), एन सात सिडको (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू घाटीत रांजणगाव शेणपूजी येथील 80 वर्षीय स्त्री, पैठणमधील हमाल गल्लीतील 80 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये खंडोबा मंदिर सातारा परिसरातील 68 वर्षीय पुरूष आणि एन पाच, गुलमोहर कॉलनीतील 85 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *