आरोग्य यंत्रणा बळकट करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

May be an image of 3 people and people standing

औरंगाबाद,११ जुलै /प्रतिनिधी :- आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी बदलत्या काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करुन आरोग्य यंत्रणा बळकट करा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या “अमृत 2022” या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

May be an image of 6 people, people sitting and people standing

      या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.वर्षा रोठे, उपअधिष्ठाता एम.एस.बेग, डॉ. चौधरी, डॉ. श्रीनिवास गडाप्पा यांच्यासह, प्राध्यापक व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची  उपस्थिती होती.

May be an image of 6 people, people standing and indoor

      समाजमनाची विचारप्रक्रिया बदलत असून काळानुसार योग्य काय आहे. याचा स्वीकार करुन मेहनतीने करिअर करावे, नवीन तंत्रज्ञानात कृत्रिम रोबोटिक्स उपचार पद्धती, टेलिमेडिसीन, या आरोग्य क्षेत्रातील उपचार पद्धतीचे शिक्षण घ्यावे. जिल्ह्यात फार्मा क्षेत्रातील उत्पादन जास्त असून मेडिकल टूरिझम या संकल्पनेचा अवलंब करावा. कोविड उपचारासाठी घाटी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधामध्ये वाढ केली असून लवकरच विद्यार्थ्यांच्या क्रिडागंणासाठी जागेचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश रुग्णालय व महाविद्यालय प्रशासनास श्री. चव्हाण यांनी दिले. मेहनत, अभ्यासाने करिअर करित असताना आई-वडील, गुरुजन व मित्र यांचा आदर ठेऊन आपला नावलौकिक मिळवावा असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

May be an image of 3 people, people standing and indoor