खासदार जलील यांना मातृशोक -जकीया सय्यद अब्दुल जलील यांचे निधन

औरंगाबाद,७ मार्च / प्रतिनिधी :-खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्री जकीया जलील (वय 82) यांचे दिर्घ आजाराने खासगी रूग्णालयात सोमवारी (7 मार्च) रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांची नमाज ए जनाजा जामा मशीद येथे सोमवारी रात्री 11.00 वाजेच्या दरम्यान अदा करण्यात आली.  तर दफनविधी हुजूर शहा मियॉ दर्गा परिसरातील कब्रस्तान, महानगर पालिका समोर, औरंगाबाद येथे करण्यात आला .

त्यांच्या पश्चात बहरिन येथे कार्यरत असलेले जफर जलील, खासदार इम्तियाज जलील आणि जेट एअरवेजचे माजी व्यवस्थापक अहेमद जलील ही तीन मुले आहेत. तसेच चार मुलींसह सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जकीया सय्यद अब्दुल जलील या कॉलनी परिसरातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करित असत, त्या अरेबीचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत असत.