वैजापूरच्या भक्तांनी अमरनाथ यात्रेत सर्वात उंच ठिकाणी तिरंगा फडकवला

वैजापूर ,८ जुलै  /प्रतिनिधी :- अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या वैजापूर येथील गजानन भक्तांनी अमरनाथचे दर्शन घेऊन सर्वात उंच ठिकाणी भारतीय तिरंगा ध्वज फडकून देशाच्या या राष्ट्रीय प्रतिकाचा सन्मान केला. त्यांच्या या भावभक्तीचे  वैजापूर येथील गजानन भक्त काशिनाथ आगाज, संतोष बोथरा व धोंडीरामसिंह राजपूत यांनी अभिनंदन केले.

अमरनाथच्या या यात्रेत गजानन भक्त श्रावण चौधरी, विनायक व्यवहारे, निलेश टूपके, अमोल निखाडे, अक्षय सोकटकर, अमृत पंडित, सुनील बसवेकर, योगेश पवार व आकाश वर्मा यांचा समावेश आहे.