खंबाळा सोसायटीची बिनविरोध निवडणूक ; चेअरमनपदी बाबासाहेब पाटील लांडे यांची निवड

वैजापूर ,३० जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील  खंबाळा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गुरुवारी (ता.30) झालेल्या बिनविरोध निवडणूकीत  बाबासाहेब पाटील लांडे यांची चेअरमन पदी तर दत्तात्रय पाटील कोल्हे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाली.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबासाहेब पाटील जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, संजय पाटील बोरनारे, कल्याण पाटील जगताप यांनी नवनिर्वाचित  झालेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी बाबासाहेब पाटील बोरनारे, बाबासाहेब जाधव, सोन्याबापू गोरसे, सतिश खंडांगळे, राजू काका हिंगे, अशोक पाटील हिंगे, रविंद्र नाईकवाडी, अजय पा गोरसे, कैलास प्रतीक निर्मळ, दिपक लांडे, शांताराम पोटे, रमेश बनकर, शांताबाई मते, शशिकलाताई लांडे, उपसरपंच अमोल पाटील निर्मळ, गोरखनाना वाळुंज व सर्व प्रमूख पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थीत होते.