पालखेड व महालगाव परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

वैजापूर ,७ जुलै  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लासुर सर्कलमधील पालखेड तसेच महालगांव परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड व ग्रीन ग्लोब फाऊंडेशन इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बियाणे वाटप करण्यात आले.वैजापूर तालुक्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या महालगांव (39), कऊटगांव (62), शनी देवगांव (111), चेंडूफळ (42), चांदेगांव (52) आणि वांजरगाव (68) अशा जवळपास चारशे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन बॅग मका, एक बॅग कपाशी, एक बॅग बाजरी असे बियाणे वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त लासुर सर्कलमधील तसेच पालखेड गणामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही गोलवाडी येथे एका कार्यक्रमात मोफत बियाणे वाटप करण्यात आली.भाजपचे अनिल वाणी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजूर्डे, अनिल वाणी, नितीन जोशी, पंचायत समिती सदस्य डॉ.बाबासाहेब डांगे,कडू भाऊ कुरकुटे, विकास मेघळे, सोमनाथ झिंजुर्डे, अशोक टेमकर, गणेश पवार आदी उपस्थित होते.