सेवानिवृत्त शिक्षक छबूराव लोंढे यांचे निधन

वैजापूर ,२८ जून  /प्रतिनिधी :- येथील निवृत्त शिक्षक छबुराव मुरलीधर लोंढे (वय 82 वर्ष, रा.मांजरे कॉलनी) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते पंचायत समितीचे कर्मचारी सुनील लोंढे यांचे वडील होत.