पेंडफळ सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा विजय ; 80 वर्षीय आजीबाई विजयी

वैजापूर, १७ जून /प्रतिनिधी :-
सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था [सोसायटी] वर गोकुळ पाटील आहेर यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द करत परिवर्तन गटाचा पराभव करत पूर्ण 12 जागेवर विजयश्री खेचून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे.
पेंडेफळ सोसायटीसाठी (ता.14) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात 318 मतदारांपैकी 308 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात सभासदांनी गोकुळ पाटील आहेर यांच्या बाजूने कौल देत पूर्ण 12 जागा प्रंचंड मतांनी  विजयी करून दिल्या.विशेष म्हणजे या निवडणुकीच्या आखाड्यात 80 वर्षे वयाच्या आजीबाई देखील उतरल्या होत्या त्यांचा देखील विजय झाला आहे.सर्वसाधारण मतदार संघातून इंदुबाई कचरू आहेर या आजींनी 155 मतदान घेत विजय मिळवला आहे. तर याच गटातून    गोकुळ पाटील आहेर हे सर्वात जास्त मतांनी विजयी झाले.विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी – कृष्णा मन्सूब आहेर (172)  गोकुळ पंढरीनाथ आहेर (177);चांगदेव राजाराम आहेर (153) बापू मन्सूब आहेर (168) भाऊसाहेब नाना आहेर (149), महेश भाऊसाहेब आहेर (146), राजाराम बाजीराव चव्हाण (153)  महिला राखीव मतदार संघातून
इंदुबाई गोकुळ आहेर (179), शोभाबाई नानासाहेब आहेर(164) , इतर मागासवर्गीय मतदार संघातून वनमाला कडूभाऊ आहेर (169) , अनु जाती. अनु जमाती मतदार संघातून यशवंता पुंजाबा पठारे (174) मतदान घेऊन विजयी झाले.