वैजापूर मर्चंट बँकेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

वैजापूर ,१४ मार्च / प्रतिनिधी :- विविध क्षेत्रात कार्यरत‎ असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा वैजापूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बैंकेच्यावतीने महिला‎ दिनानिमित्त सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी,उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, इंडीयन ओव्हरसीज बँकेच्या माधुरी निमजे, सुनीता संचेती, सविता संचेती, तृप्ती संचेती, तारा सुराणा, बँकेचे शाखाधिकारी सुचिता लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती‎ होती. यावेळी उपस्थित महिलांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ  व भेट देवून सत्कार‎ करण्यात आला. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी यावेळी‎ महिलांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन‎ आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची‎ आवश्यकता असल्याचे सांगितले.‎ कुटुंब सांभाळून महिला करत‎ असलेल्या प्रत्येक कामात आम्ही‎ सोबत आहोत. छोटे-छोटे उद्योग‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उभारून तरुणींच्या हाताला काम‎ दिल्यास भविष्यातील पिढी अधिक‎ सक्षम होईल, असे ते म्हणाले. शेती‎ हादेखील व्यवसाय असून या‎ महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी‎ काम केले पाहिजे असे आवाहन‎ त्यांनी केले. महिलांनी महिलांसाठी‎ सहकारी पतसंस्था सुरू केल्यास त्या‎ माध्यमातून छोटे उद्योग उभारले‎ जाऊ शकतात. त्यासाठी‎ कर्तृत्ववान महिलांनी पुढाकार‎ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. या‎ कार्यक्रमास महिलांची‎ मोठी उपस्थिती होती