केंद्रीय लोकसेवा आयोगाची 33 केंद्रांवर आयोजन

10 हजार 510 उमेदवारांना प्रवेश, 1 हजार 552 अधिकारी, कर्मचारी नियुक्त

औरंगाबाद ,२४ मे /प्रतिनिधी :- केंद्रीय लोकसेवा आयोग,नवी दिल्ली यांच्या मार्फत जिल्हा केंद्रांवर 5 जून 2022 रोजी  विषयांकीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.  5 जून  2022 रोजी पहिल्या सत्रात सकाळी  9.30 ते 11.30  व दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत परीक्षा होईल. सदरील परीक्षेसाठी 33 जिल्हा केंद्रांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विषयांकित परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी  10 हजार 510 उमेदवारांना प्रवेश आहे. परीक्षेसाठी  1552 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

परीक्षा कक्षात प्रवेशासाठी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र, स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड वाहन चालविण्याचा परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मूळ ओळखपत्र, या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य, वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही. उमेदवारासोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्यूटूथ, कॅमेरा फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल.

परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली येथून आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. असेही त्यांनी कळविले आहे.