ऑक्सिजन प्लांट जवळील भिंत पाडण्याचे आदेश ,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलीऑक्सिजन प्लांटची पहाणी

औरंगाबाद ,२१ एप्रिल/प्रतिनिधी ​

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घाटी येथील  ऑक्सिजन प्लांटची पहाणी केली.


घाटीतील सुपर स्पेशलिटी ब्लॉक येथील ऑक्सिजन प्लांट पर्यंत ऑक्सिजन टँकर पोहचू शकत नसल्याने थोड्या प्रमाणात ऑक्सिजन वाया जात असे शिवाय रस्त्यावरील वळणावरून अपघाताची संभाव्य शक्यता नाकारता येण्यासारखी नाही ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या जागेची पहाणी करत ऑक्सिजन प्लांट जवळील भिंत पाडण्याचे आदेश PWDचे अभियंता कदिर यांना देत त्या जागी गुणवत्तापूर्ण गेट बसवण्याचे निर्देश देखील दिले. यावेळी खासदार इम्तियाज जलील तेथे आले व त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कामाचे कौतुक करत जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता वाढविल्या बद्दल आभार व्यक्त केले.
यानंतर मेडिसीन विभागाच्या बाजूला असणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची पहाणी जिल्हाधिकारी यांनी केली.  ऑगस्ट मध्ये ११० सिलेंडरची असलेली ऑक्सिजन क्षमता आता 6 हजार 625 सिलेंडर पर्यंत वाढली असल्याने जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच ऑक्सिजनचा वापर काटेकोरपने करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.
सोबतच जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून नव्याने तयार होत असलेल्या वॉर्ड क्रमांक चार येथील कोरोना सेंटरची पहाणी करून संबंधितांना अवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळरीकर,आणि PWDचे अभियंता कदिर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.