वैजापूर तालुक्यात भाजपला खिंडार ; औरंगाबाद जिल्हा सरचिटणीससह कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

वैजापूर,५ मे  /प्रतिनिधी :- भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड.अनिल वाळुंज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नुकताच औरंगाबाद येथे अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे पाटील व मनसेचे तालुकाध्यक्ष दिपक जगताप यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ॲड. वाळुंज, गणपत शर्मा, माजी सरपंच भरत पाटील, सोमनाथ पगारे, चेअरमन राजेंद्र मोटे, सरपंच अमोल पाटील निर्मळ सरपंच गणेश पाटील मोटे, कॉग्रेसचे सागर वाळुंज, राष्ट्रवादी कॉग्रेसचे कविश्वर कोल्हे, बाबासाहेब मोटे, सचिन तुरे, सतिश निर्मळ, अंबादास गोरसे, दत्तात्रय वाळुंज, सागर मोटे, किरण मोरे, तात्या पंचमेढे, नानासाहेब मोटे, वैजनाथ वाळुंज, सर्जेराव पंचमेढे, प्रभाकर वाळुंज, अर्जुन पंचमेढे, नवनाथ वाळुंज आदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी

मागील नऊ वर्षापासुन मी भाजपात कार्यरत आहे. या काळात विद्यमान आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्यासमोर जिल्हा परिषदेची निवडणुक लढवली. पण पक्षाने केवळ वापर केला. त्यामुळे स्थानिक नेत्यांवर असलेल्या नाराजीतून मनसेत प्रवेश केला. पक्षश्रेष्ठींनी तालुक्याची जबाबदारी दिल्यास येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास ॲड. अनिल वाळुंज यांनी व्यक्त केला.