आमदार अंबादास दानवे यांची विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती

औरंगाबाद ,५ मे /प्रतिनिधी :-दक्षिण मध्य रेल्वे, हैदराबाद विभागाच्या विभागीय सल्लागार समितीवर औरंगाबाद – जालना विधानपरिषद मतदार संघाचे आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद मंडळाचे सभापती रामराजे निंबाळकर व उपसचिव सुदर्शन साठ्ये यांनी नियुक्तीचे पत्र देऊन आमदार अंबादास दानवे यांचे अभिनंदन केले.