खुलताबादमध्ये सम-विषम पार्किंग ,खुलताबादकरांना रस्त्यावर अधिकृतपणे वाहन उभे करण्याची सुविधा

खुलताबाद,२१ नोव्हेंबर/प्रतिनिधी :- गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या  खुलताबाद शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुलताबाद पोलिसांनी आता ठोस पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून खुलताबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान मोहल्ला परिसरातील रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात येत आहे. या क्षेत्रांमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून त्याचबरोबर रस्त्यावर बेकायदा वाहन उभे केल्याच्या कारणावरून  पोलिसांसोबत होणारे वाद टळणार आहेत. याशिवाय, खुलताबादकरांना रस्त्यावर अधिकृतपणे वाहन उभे करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रस्त्यावरील बेकायदा वाहतुकीला लगाम लागणार असून रहिवाशांना वाहने उभारण्याची अधिकृत सोय उपलब्ध होणार आहे. 

Displaying IMG-20211121-WA0009.jpg

वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी हा प्रयत्नपोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे

शिस्त लावण्यासाठी सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी रस्त्यांची पाहाणी करून टप्प्याटप्प्याने हे क्षेत्र निश्चित करण्यात येत आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी हा प्रयत्न सुरू केला आहे.

—————————————————

खुलताबाद पोलिसांनी आता खुलताबाद शहरात सम-विषम पार्किंग, एकदिशा मार्ग, नो-पार्किंग क्षेत्र निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान मोहल्ला या रस्त्यांवर हे क्षेत्र निश्चित करण्यासंबंधीच्या अधिसूचना काढण्यात आल्या असून त्याची  पोलिसांनी अंमलबजावणी करण्यासही सुरुवात केली आहे.

खुलताबाद शहरांतील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडू लागले असून यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविताना पोलिसांचीही दमछाक होत आहे.  शहरामध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे शहरातील नागरिक रस्त्यावर कोठेही वाहने उभी करीत असून त्यामुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

खुलताबाद शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान मोहल्ला या खूप रहदारी असलेल्या उत्तर-दक्षिण रस्त्यावर पी एक सम तारीख व पी दोन विषम तारीख दरम्यान करावयाचे दुचाकी, चारचाकी, रिक्षा या वाहनाचे पार्किंगचे नियोजनाबाबत जनजागृती करण्यात आली.  तसेच सदरील रहदारीच्या मुख्य रस्त्यावर पी एक व पी दोन  दर्शक फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत.  २१ नोव्हेंबर हि तारीख  रस्त्याचे पूर्व बाजूने सर्व वाहने पार्क करण्याबाबत वाहनधारकांना सुचित करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहने ही एक साईड म्हणजेच सदरील रस्त्याचे पूर्व बाजूला पार्क करून घेण्यात आलेले आहेत. हा बदल वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतुकीला एक नियमित शिस्त लागावी यासाठी करण्यात आलेला आहे.