वैजापूर शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

वैजापूर,५ मे  /प्रतिनिधी :-ब्राह्मण सभा वैजापूर व सकल ब्राह्मण समाजातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (ता.3) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. महादेव मंदिरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत ,,आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मा.नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती,भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, डॉ.हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले,नगरसेवक शैलेश चव्हाण, दशरथ बनकर, स्वप्नील जेजुरकर, गणेश खैरे, पारस घाटे,भाजपचे गौरव दोडे, गणेश पहाडी, गोकुळ भुजबळ, शैलेश पोंदे, गिरीश चापानेरकर, सुधीर लालसरे, सचिन जोशी यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.