अखेर दहेगावच्या शेतकऱ्यांना 20 वर्षांपूर्वी संपादित जमिनीचा मोबदला मिळाला

आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नांना यश

वैजापूर,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शासनाने गेल्या अनेक वर्षांपूर्वी तालुक्यातील दहेगाव व चांदेगाव येथील शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आ.रमेश पाटील बोरणारे यांनी पाठपुरावा केल्यामुळे मिळाला.

तालुक्यातील दहेगाव येथील काही शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्ग नागपूर-घोटी 752-I रस्त्यात गेल्याने त्यांना भुसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी स्वत: अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करून 20 वर्षापूर्वी पासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. चार शेतकऱ्यांना 42 लाख रुपये मंजूर झाले. तसेच चांदेगाव येथील पूल बांधकामासाठी 13 वर्षापूर्वी भूसंपाद जमिनीचा देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्या शेतकऱ्यांस 18 लाख रुपये मंजुर झाले. असे एकुण 60 लाख रुपयांचे धनादेश  श्रीमती नंदाबाई उगले, लक्ष्मीबाई मेटे, कारभारी पा मेटे, गणेश उगले, विमलगिरी महाराज, भगवान धिवर या सर्व शेतकऱ्यांना आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते सपुर्द करण्यात आला.   

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, माजी उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, संजय बोरनारे, रणजीत चव्हाण, भरत कदम, अक्षय कुलकर्णी, नितीन महापुरे आदी उपस्थित होते.