वैजापूर तालुक्यात बीआरएस पक्ष वाढविण्यासाठी चिकटगावकर यांचा पुढाकार ; पालखेड येथे पक्षाचे कार्यालय सुरू

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे सुरू करण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य  अभय पाटील चिकटगावकर यांनी काही महिन्यापूर्वी पक्षात जाहीर प्रवेश केला होता त्यानंतर या पक्षाची तालुक्यात व जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी अभय चिकटगावकर यांनी पुढाकार घेतला असून तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र संपर्क कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून वैजापूर तालुक्यातील पहिले संपर्क कार्यालय पालखेड येथे स्थापन करण्यात आले. येथील पारेश्वर मंदिरात पारेश्वराचे दर्शन घेऊन पक्ष बांधणीचे संकल्प करण्यात आला. तसेच गावातील महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालखेड येथे प्रवीण भाडाईत यांनी पहिले संपर्क कार्यालय सुरू करून पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत फक्त गुलाबी झेंडा फडकवणारच असा विश्वास यावेळी अभय चिकटगावकर यांनी व्यक्त केला.