महालगाव येथे शेतातील ऊसाला भीषण आग ऊसासह आदिवासी कुटुंबाचा घर व संसारोपयोगी साहित्य जळून खाक ; जीवित हानी नाही

वैजापूर,८ एप्रिल  /प्रतिनिधी :-तालुक्यातील महालगांव येथे तोडणीस आलेल्या ऊसासह एका आदिवासी कुटुंबाच्या घराला आग लागुन संसार उपयोगी साहीत्य जळुन  लाखो रुपायचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. 

तलाठी यांनी घटनास्थळाला भेट पंचनामा केला. नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. यामुळे शेजारी असलेल्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान टळले व कुठलीही जीवित हानी झाली नाही. वाल्मीक विठ्ठल जाधव यांच्या गट क्रमांक 285 मधील एक एकर ऊस व राजू लक्ष्मण झिंजुर्डे या शेतकऱ्यांच्या ऊसाला तोड होती. या आगीत गट क्रमांक 290 यांचा पाच एकर ऊसासह  ठिबक सिंचन संच जळाला. पंडीत सोमनाथ माळी यांच्या राहत्या घराला आग लागून पाच क्विंटल धान्य, टीव्ही, संसारोपयोगी साहीत्य जळून खाक झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आग विझवण्यासाठी  अंबादास जाधव, उपसरपंच प्रकाश आल्हाट, राजु झिंजुर्डे,  आकाश झिंजुर्डे, सिध्दार्थ जाधव, रभाजी आल्हाट, आशोक आल्हाट, दिपक जाधव यांनी प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी पंचायत सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, देविदास जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख डाॅ. प्रकाश शेळके, माजी  ग्रामपंचायत सदस्य कैलास शेळके, गणेश शेळके, संपत जाधव, संजय झिंजुर्डे, दगडु जाधव, योगेश मोहिते,  कैलास बनकर, , सुनिल आल्हाट, विजय आल्हाट यांनी सहकार्य केले. पोलिस पाटील सुधाकर शेळके, तलाठी एस. एस. धनवे, कोतवाल अब्दुल शेख यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.