वैजापूर तालुक्यातील चार विद्यार्थ्यांची ‘हवाई सफर’ शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी निवड

वैजापूर ,१८ मे  / प्रतिनिधी :- विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतुन जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रत्यक्ष रॉकेट उड्डाणाचा अनुभव देण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधील जिल्हास्तरीय चाचणीद्वारे २८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या विमानाद्वारे १५ ते २० में या कालावधीत तिरुअनंतपुरम, बंगलोर व अन्य महत्वाच्या ठिकाणी शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी पाठवण्यात आले.

ही सहल विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण शासकिय खर्चाने असणार आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या २८ विद्यार्थ्यांमध्ये नारळा जिल्हा परिषद शाळेची सारिका सोमासे, गौरव सोमासे, घायगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा आशिष साळुंके व निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सरस्वती जाधव या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे आमदार रमेश पाटील बोरनारे, गट विकास अधिकारी एच.आर. बोयनर, गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर व विस्तार अधिकारी म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या. चेलीपुरा हायस्कुल, छ. संभाजीनगर येथुन शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, जयश्री चव्हाण (प्राथमिक) व प्रकल्प प्रमुख जैन यांनी शुभेच्छा दिल्या.